संत नामदेव महाराजांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर ते घुमाण " नामदेव ज्योत दौड " यात्रेचे आयोजन

संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या ७५३ व्या जयंती

संत नामदेव महाराजांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर ते घुमाण " नामदेव ज्योत दौड " यात्रेचे आयोजन

संत नामदेव महाराजांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर ते घुमाण " नामदेव ज्योत दौड " यात्रेचे आयोजन

 महाराष्ट्र - मध्यप्रदेश - राजस्थान - उत्तरप्रदेश - हरियाणा - पंजाब राज्यातून २१ दिवसात २१०० किलोमीटरचा  प्रवास

पंढरपूर  संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या ७५३ व्या जयंती निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण  ( पंजाब ) या २१ दिवसांच्या सुमारे २१०० किलोमीटर  " संत नामदेव ज्योत दौड " यात्रेचे आयोजन करण्यात आले असून ही यात्रा महाराष्ट्र , मध्यप्रदेश , राजस्थान , उत्तरप्रदेश , नवी दिल्ली , हरियाणा मार्गे पंजाब राज्यातील श्री क्षेत्र घुमाण  अशी काढण्यात येणार असल्याची माहिती भागवत धर्म प्रसारक समितीचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांनी दिली .

भागवत धर्म प्रसारक समिती , पालखी सोहळा पत्रकार संघ व अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने कार्तिक शुध्द एकादशी म्हणजे गुरुवार दि . २३ नोव्हेंबर रोजी या  संत नामदेव ज्योत दौडीचा शुभारंभ संत नामदेव महाराजांचे जन्मस्थान असलेल्या श्री क्षेत्र पंढरपूर येथून करण्यात येणार आहे . 

पंढरपूर येथे अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवीदिल्ली शाखा महाराष्ट्र राज्याची त्रैमासिक बैठक आयोजित करण्यात आली होती . या बैठकीत भिसे यांनी " संत नामदेव ज्योत दौड " यात्रेची माहिती दिली . भिसे म्हणाले , गतवर्षी महाराष्ट्र , गुजरात , राजस्थान , हरियाणा , पंजाब यामार्गे सायकल यात्रा काढण्यात आली होती . त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला . संत नामदेव महाराजांच्या  महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो भक्तगणांनी ही दौड महाराष्ट्र , मध्यप्रदेश , राजस्थान , उत्तरप्रदेश , नवी दिल्ली , हरियाणा मार्गे पंजाब राज्यातील घुमाण या संत नामदेव महाराजांच्या कर्मभूमीत न्यावी अशी मागणी केली . त्यानुसार हा मार्ग बदलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले . संत नामदेव महाराजांनी भागवत धर्माच्या प्रचार व प्रसारासाठी उत्तर भारताचा दौरा केला होता . आजच्या विज्ञान युगात त्यांच्या वारकरी सांप्रदायाच्या विचारांचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून या दौडीचे आयोजन करण्यात आले असून २१ दिवसांची ही दौड श्री क्षेत्र घुमाण ( पंजाब ) येथे मार्गशीर्ष शुध्द १ बुधवार दि . १३ डिसेंबर रोजी पोहोचेल . घुमाण येथे दोन दिवसांच्या मुक्कामानंतर ही दौड यात्रा परतीच्या प्रवासात मार्गशीर्ष शध्द एकादशी दिवशी म्हणजे शनिवार दि . २३ डिसेंबर २०२३ रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचेल . या दौड यात्रेत ज्यांना सहभागी व्हायच आहे त्यांनी सूर्यकांत भिसे 9822023564 , मनोज मांढरे 9422303343 , ॲड विलास काटे 8788477057 , मनोज भांडारकर 9371201015 ,  सुभाष भांबुरे 9822414030 व राजेश धोकटे 9420491414 यांच्याकडे नांव नोंदणी करावी असे आवाहन भिसे यांनी केले आहे . 

या बैठकीस नामदेव महाराजांचे १६ वे वंशज ह भ प मुकुंद महाराज नामदास , अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवीदिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ नारायणराव पाथरकर , महासचिव एस एस सोहनी , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेश ढवळे , उत्तराखंड अध्यक्ष राकेशकुमार आर्य , हरियाणा अध्यक्ष बलजितसिंग , देवास मध्यप्रदेश रेखा वर्मा , भोपाळ अरुण नामदेव , ओरिसा महेंद्रसिंग दर्जी , चेन्नई कमलेश भराडीया,  छत्तीसगढ राकेश परमार , उत्तर प्रदेश सुरेश नामदेव , ग्वाल्हेर जी टी नामदेव , राजस्थान मोहनलाल छिपा , पंढरपूर अध्यक्ष गणेश बापू उंडाळे , जळगाव मनोज भांडारकर , पुणे  मनोज मांढरे , सोलापूर जिल्हाध्यक्ष राजेश धोकटे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते .